ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

धनगाव ग्रामपंचायतीचा डॉल्बीमुक्त गावचा ठराव ; भिलवडी पोलिस ठाण्याला निवेदन

धनगावचे सरपंच संदीप यादव यांच्यासह ग्रामस्थांचा पुढाकार ; लोकांमधून कौतुक

दर्पण न्यूज भिलवडी ;-  सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील धनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने डॉल्बीमुक्त गाव हा ठराव घेण्यात आला. याला ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण मुलांचा पाठिंबा दिला ‌. याबाबतचे निवेदन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांना देण्यात आले.

डॉल्बी मुळे होणारे दुष्परिणाम व बिघडत चाललेली तरुण पिढी व याचे अनुकरण करणारी लहान मुले याला कुठेतरी आळा बसावा व गावातील ग्रामस्थ महिला हृदयविकाराचे पेशंट व लहान मुलांना याचा त्रास होऊ नये यासाठी धनगाव ग्रामपंचायतीने डॉल्बी बंदीचा ठराव घेतला. यासाठी गावातील सर्व तरुण मंडळांनी सहकार्य करून सहमती दर्शवली. तसेच गावातील ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दिला. या ठरावाचे निवेदन भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  भगवान पालवे  यांना देण्यात आले.

यावेळी धनगावचे सरपंच संदीप यादव ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य हनमंत यादव, रमेश केवळे पोलीस पाटील मनीषा मोहिते , माजी उपसरपंच घनश्याम साळुंखे,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपाध्यक्ष अविनाश शेळके,अमित कुर्लेकर, रवींद्र साळुंखे, शैलेश साळुंखे, प्रशांत(बापू)साळुंखे ,पवन सावंत,प्रज्योत साळुंके, ऋषिकेश भोसले, अक्षय साळुंखे, अनिल साळुंखे, सागर साळुंखे, सुरज मोहिते, बंडा सावंत,आदर्श साळुंखे,सुनील मोहिते सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!