
कोल्हापूरः अनिल पाटील
– तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्री चा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडे करारवरती कागल तालुक्यात जमीन घेतली असून ही जमीन एन ए करणेकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मुळ मालकाचे वतीने अर्ज केला होता . या जमिनीच्या एन” ए करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे श्रिमती अश्विनी अतूल कारंडे “वय 46 पद अव्वल कारकून “तहसिल कार्यालय कागल वर्ग —3 रा. शाहूपूरी कोल्हापूर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतः करीता 60,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 30,000/- रुपये लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केलेप्रमाणे कारंडे यांनी तक्रारदार यांचेकडून 30,000/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक
सपोफो / श्री प्रकाश भंडारे पोहेकॉ / श्री अजय चव्हाण
पोना / सुधीर पाटील, आदीनी केली.