ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भिलवडी गावच्या उपसरपंच पदी मनोज चौगुले यांची बिनविरोध निवड

समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी अन् जल्लोष

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील  माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या करेक्ट मार्गदर्शनाखाली भरीव विकास कामे करणाऱ्या भिलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे मनोज चौगुले यांची बिनविरोध करण्यात आली. या निवडीनंतर चौगुले यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी अन् जल्लोष  करण्यात आला.

पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायत  ही  तशी मोठी म्हणून ओळखली जाते. उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांपासूनच भिलवडी उपसरपंच निवड होणार असल्याचे लोकांतून बोलले जात होते. आज मात्र या निवडीसाठी सकाळ पासूनच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मध्ये धावपळ सुरू होती.  काही ग्रामपंचायत सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. मात्र, भिलवडी गावचे काँग्रेसचे नेते  माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने उपसरपंच पदाचे नाव सूचवले.

या उपसरपंच निवडीसाठी ग्रामसेवक कैलास केदारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य मनोज चौगुले यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. याला सूचक ग्रामपंचायत सदस्य मनोहर गुरव होते. काही वेळानंतर काँग्रेसचे मनोज चौगुले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सरपंच विद्या संचिन पाटील, माजी सरपंच सविता महिंद पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने  उपसरपंच मनोज चौगुले यांचा सत्कार केला.

यानंतर उपसरपंच मनोज चौगुले यांचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, बाळासो मोरे, मोहन नाना तावदर, तंटामुक्ती अध्यक्ष  बाबासो मोहिते, काँग्रेसचे सरचिटणीस बी डी पाटील सर, पलूस बाजार समितीचे  किणीकर, सामाजिक कार्यकर्ते  राहुल कांबळे, बाळासो महिंद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा शिंदे , खंडू शेटे, कपिल शेटे, विद्या ऐतवडे, अमोल चौगुले, सागर वावरे, दर्पणचे मुख्य संपादक पत्रकार अभिजीत रांजणे, पत्रकार शशिकांत राजवंत, पंकज गाडे, विशाल कांबळे, , प्रशांत चौगुले , मुन्ना पट्टेकरी, सचिन पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या उपसरपंच निवडीनंतर चौगुले समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

उपसरपंच मनोज चौगुले यांनी  काँग्रेस कार्यालय भिलवडी येथील कै.बाळासाहेब काका पाटील ,माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, माजी मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.तसेच माजी सहकार मंत्री तथा  आमदार डॉ.विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय भिलवडी येथे भेट देऊन माजी मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

दरम्यान, उपसरपंच मनोज चौगुले म्हणाले, की उपसरपंच निवडीसाठी भिलवडी गावचे ज्येष्ठ नेते राजू दादा पाटील, संग्राम दादा पाटील, आनंदराव भाऊ मोहिते, बाळासाहेब मोहिते, राजू मोहिते आणि काँग्रेसचे पदाधिकारी व भिलवडी ग्रामपंचायत सदस्य यांनी  माझी निवड केली याबद्दल मी आभार आहे. तसेच  उपसरपंच पदाच्या माध्यमातून भिलवडीचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर असेल, असे सांगून या कामासाठी भिलवडी ग्रामपंचायत सदस्यांना ही मी बरोबर घेऊन काम करणार, असेही सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!