महाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील मोहङे येथे घरावर दरङ कोसळली : घटनेत कोणतीही जीवित हानी नाही

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस पङत असल्याने मोहङे येथील चंद्रकांत पांङूरंग पाटील यांच्या राहात्या घराच्या पाटीमागे दरङ कोसळली आहे.ती दरङ त्यांच्या घरावर पङल्याने घराचे मोठे नूकसान झाले असले तरी कोणतीही जिवित हानी झालेली नाही. त्यांच्या कूटूंबात 2 स्त्रिया 4 पूरूष राहातात. तर एक मूलगा नोकरी मूळे बाहेर राहतो. या कूटूंबाचे दूसरे घर गावात आहे. त्या ठिकाणी सर्वानां हलविण्यात आले आहे. घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे घटनास्थळी दाखल झाले आहेत.