दुधोंडी येथील शिवाजी सेवा सह. जलसिंचन योजना मर्या. नं १ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

दुधोंडी
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा जे के (बापू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवाजी सेवा सह. जलसिंचन योजना मर्या. नं १ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली .यावेळी सभासदांनी या संस्थेवर विश्वास ठेवल्याने निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली आहे या संस्थेची प्रगती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न जे के बापू जाधव यांनी विश्वास व्यक्त केला.
*नवनिर्वाचित संचालक मंडळ*
*सर्वसाधारण:*
*उत्तम रामचंद्र धनवडे, भीमराव बाबूराव कदम, वसंत महादेव कदम, सचिन मुरलीधर जाधव, सुनील भगवान साळुंखे, भीमराव पांडुरंग जाधव, दिनकर केशव आरबूने, सुरेश ज्ञानदेव रानमाळे*
*महिला राखीव:*
*दिपाली चंद्रकांत साळुंखे*
*अनुसया भगवान गावडे*
*अनु जाती जमाती :*
*आप्पा निनाप्पा तिरमारे*
*इतर मागास प्रवर्ग:*
*राजेंद्र शामराव माळी*
*भ. व वि. ज. / वि. मा. प्रवर्ग*
*बाळासो बाबूराव जाधव*
*निवडणूक प्रक्रियेचे काम निवडणूक निर्णय अधिकारी महेश शिताफे यांनी काम पहिले तर यावेळी या निवडणूक कार्यक्रमाप्रसंगी मॅनसिंग को ऑप बँकेचे चेअरमन युवा नेते सुधीर भैय्या जाधव, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे माजी चेअरमन रवींद्र आरबूने, कृष्णाकाठ दूध संस्थेचे विद्यमान चेअरमन संदीप पाटील, व्हा चेअरमन प्रशांत चव्हाण, कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन दिलीप जाधव, संचालक श्रीकांत कदम, कृष्णाकाठ डी हायड्रेशन चेअरमन जोतीराम साळुंखे, दुधोंडी ग्राम विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र जाधव, शहाजी जाधव, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, शिवाजी जलसिंचन योजना नंबर १ चे माजी चेअरमन रामचंद्र जाधव, नागनाथ साळुंखे, सदाशिव कदम, आनंदा आरबूने, दत्तात्रय दळवी, तसेच या संस्थेचे कर्मचारी वर्ग सचिव किरण आरबूने, अनिल दळवी, अजित जाधव, बंडा जाधव व सभासद, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.