युवा संवाद घोंगडी बैठकांना पलूस तालुक्यात प्रतिसाद
चोपडेवाडी आणि माळवाडी गावात *युवा संवाद घोंगडी बैठक* मोठ्या उत्साहात

भिलवडी: पलूस कडेगाव विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने *आ. डॉ. विश्वजीतजी कदम साहेब* यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या वतीने *युवा संवाद घोंगडी बैठकांच* आयोजन गावोगावी करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून चोपडेवाडी आणि माळवाडी या गावात *युवा संवाद घोंगडी बैठक* मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.आ. डॉ. विश्वजीतजी कदम साहेब यांचे *मताधिक्य हे येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक असावं* यासाठी प्रचार करताना कोणते मुद्दे हाताळावेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जी लोकांना आश्वासित करत आहे ती लोकांच्या पर्यंत कशी पोहोचवावी त्याचबरोबर विश्वजीत कदम साहेब यांचे काम तळागाळात पोहोचवण्याची जबाबदारी युवकांनी घ्यावी तसेच वेगवेगळ्या फसव्या योजना आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यावा या सर्व गोष्टींची माहिती या निमित्ताने सर्वांना दिली.