साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्था तर्फे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांचा मिरज गौरव पुरस्काराने सन्मान

दर्पण न्यूज मिरज ;-
साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्था तर्फे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांना मिरज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला*
साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेच्या वतीने गेली तीस वर्षे झाली समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे प्रत्येक वर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संस्थेतर्फे सन्मान करीत असतात.यावर्षी मिरज शहरांमध्ये गेली पंचवीस ते तीस वर्षे झाली. मिरज शहराला भेसाळणाऱ्या विवीध समस्या बरोबर मिरज शहराचा सर्वांगीण विकास व इतर अन्याय,अत्याचार विरुद्ध, शासनाच्या जाचक अटी,ध्येय धोरणाविरुद्ध जनहिताकरिता आपल्या आंदोलनाच्या कार्यातून वेगळा ठसा उमटलेले जैलाब शेख यांना *मिरज गौरव* पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मोरे डॉक्टर जय धवल भूमाज डॉक्टर सोमशेखर धर्मवीर पाटील व तानाजी सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जहांगीर भाई जमादार,रवींद्र काळे,सौ निर्मला मोरे,रुक्मणी आंबिगिरे,अशोक आवळे,प्रकाश कोकाटे, सौ सुनिता काळे,सौ संगीता विभुते सहित मान्यवर उपस्थित होते.यावेळी जैलाब शेख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिवाजीराव मोरे यांनी सतत आमच्या सारख्या वंचित व उपेक्षित कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे म्हणजे आम्हाला दहा हत्तीचे बळ प्राप्त होते या पुरस्कारामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे मी पहिले ही काम करीत होतो.आत्ताही मी नेटाने व जोमाने तसेच ताकतीने काम करेन असे यावेळी मनोगत व्यक्त करताना शेख म्हणाले व साईकृपा साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे सर्व संचालक मंडळाचे पदाधिकारांचे आभार मानले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव मोरे म्हणाले की आमची संस्था दलित पीडित वंचित व भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणारी संस्था आहे व मुलांना शिक्षण देण्यासाठी अहोरात प्रयत्नशील असते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांना सन्मानित करून त्यांना ऊर्जा देण्याचे काम हे संस्था करते असे शिवाजीराव मोरे म्हणाले शेवटी आभार संस्थेचे रवींद्र काळे यांनी मानले.