आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी येथील मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व.आ.डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित महाशिबीराचा वनश्री मोहनराव कदम यांच्या हस्ते शुभारंभ

 

 

दर्पण न्यूज भिलवडी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पलूस यांचे वतीने जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी ता.पलूस येथे मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वनश्री मोहनराव कदम यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच वनश्री मोहनराव कदम यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन, गौरविण्यात आले.
यावेळी राजू दादा पाटील, बाळासाहेब काका मोहिते, शहाजी भाऊ गुरव, विजयकुमार चोपडे आण्णा,सौ.सीमा शेटे,सुरैय्या तांबोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय पाटील, डॉ.आदिनाथ पिसे, डॉ.सोनल होवाळ, डॉ.प्रविण कोडग, पृथ्वीराज पाटील, बाळासो यादव, अनिकेत जगताप, रमेश पाटील, सचिन पाटील,रूपाली कांबळे, बाळासो मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बी.डी.पाटील, सुभाष कवडे
यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पलूस तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले.सुत्रसंचलन दिपक पाटील यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक बाळासो भंडारे यांनी मानले.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पलूस यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये ईसीजी, एक्स-रे, रक्तदान शिबिर, रक्त,लघवी तपासणी, महिलांची शारीरिक तपासणी, आभा कार्ड, गोल्डन कार्ड, डोळे तपासणी,अस्थीरोग व त्वचारोग तपासणी यासह विविध आजाराचे निदान करण्यात आले तसेच त्यांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली.
दरम्यान मोफत महाआरोग्य शिबिरास पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी सदिच्छा भेट देऊन,पाहणी केली व भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेल्या या मोफत महाआरोग्य शिबिराचे उत्कृष्टरित्या नियोजन करणाऱ्या पदाधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
मोफत महाआरोग्य शिबिराची माहिती भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावागावांमध्ये पोहोचण्यासाठी
आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी व आरोग्य विभागाचे विविध पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले.
या महाआरोग्य शिबिराचा तब्बल १०४६
गरजूंनी लाभ घेतला.
यामध्ये ४५१ पुरुष व ५९५ महिलांचा सहभाग होता.
या शिबिरासाठी भारती हॉस्पिटल सांगली,आदित्य ऑर्थो हॉस्पिटल,… आष्टा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आष्टा,
लक्ष्मीनारायण हॉस्पिटल इस्लामपूर , वाळवेकर हॉस्पिटल सांगली,सुदर्शन नेत्र रुग्णालय सांगली,स्पंदन हॉस्पिटल आष्टा व लाइफ केअर हॉस्पिटल पलूस यांचे मोठे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!