क्रीडामहाराष्ट्र
चंद्रे येथील पैलवान श्रीहरी सिद्धिविनायक गिरीबुवा याची नाशिक येथे होणाऱ्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील :-
राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नंदू आबदार शिवशंभो कुस्ती संकुल,चा मल्ल पैलवान श्रीहरी सिद्धिविनायक गिरी बुवा याची नाशिक येथे होणाऱ्या 57 किलो गटातून कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
करवीर तालुक्यातील दोनवडे येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून त्याची ही निवड झाली आहे. या स्पर्धा 8 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणार आहेत.
त्याला पैलवान वैभव यादव,, व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नंदू आबदार यांचे मार्गदर्शन लाभले.



