महाराष्ट्रराजकीय

भिलवडी जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गणाच्या भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार शुभारंभ

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांची भिलवडी जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे ; मान्यवरांचा भाषणात उल्लेख

 

 

 

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :-
सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने
भिलवडी जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गणाच्या भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार शुभारंभ भिलवडीचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे झाला. भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार
सुनिता शिवाजी गायकवाड भिलवडी पंचायत समिती गण, प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) भिलवडी जिल्हा परिषद गट, मंजुषा धोंडीराम पाटील वसगडे पंचायत समिती गण यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या, असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.

या प्रचार शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेल्या कामाची लोकांना माहिती द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा विकास केला आहे याचीही मतदारांना माहिती देण्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटात अनेक कामे केली आहेत, असे मान्यवरांनी सांगितले .यावेळी भिलवडी जिल्हा परिषद गट, भिलवडी पंचायत समिती गण, वसगडे पंचायत समिती गणातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!