महाराष्ट्रराजकीयसामाजिक

कुंडल जि प गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांना विजयी करा ; काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रणिता पाटील

दर्पण न्यूज पलूस/कुंडल-:

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषी दादा लाड यांना विजय करणे हीच खरी भारती ताईंना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रणिता पाटील यांनी मोराळे येथे बैठकीत केले.

कुंडल जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश महेंद्रआप्पा लाड काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून लढवित आहेत. या प्रचारासाठी काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्रणिता पाटील यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.  मोराळे येथे प्रणिता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, की स्व. डॉ पतंगराव कदम यांनी पलूस कडेगांव मतदार संघाचा विकास केला. त्यानंतर आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी या भागाचा विकास साधला. काँग्रेस चे नेते महेंद्र आप्पा लाड यांनी पलूस तालुक्यातील अनेक गावांचा विकास केला. त्याचप्रमाणे ऋषिकेश लाड यांनी साखर कारखाने उभारले अनेकांना रोजगार दिला. आज ऋषिकेश लाड कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून निवडणुकीस उभा आहेत.  त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया आणि मोठ्या मताधिक्यांनी निवडून देऊया, असेही पाटील यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!