पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस एमआयडीसी येथील उद्योजक व कामगार,, पलूस वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट ; मतदान करण्याचे आवाहन;

पलूस : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी आज पलूस एमआयडीसी येथील उद्योजक व कामगार बांधव, पलूस वकील संघटनेचे पदाधिकारी, स्टॅम्प होल्डर यांची भेट घेतली. तसेच या पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानावेळी आपण हाताच्या पंजा समोरील बटन दाबून विजयी करण्यास सांगितले. यावेळी डॉ विश्वजीत कदम यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की उद्योजक, कामगार व वकील बंधू-भगिनींनी यांनी केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. या संघटनेच्या खंबीरपणे मी पाठिशी उभा राहिल. येत्या २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन कदम यांनी केले.
यावेळी सतीश आबा पाटील, पलूस तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.