आदरणीय डॉ पतंगराव कदम यांचा संघर्ष : चटणी भाकर खावून पोट भरलं…
सह्याद्रीच्या घाटाखालचा एक भाग तर दुसरा घाटावरचा भाग होते.घाटाखालचा कृष्णा-कोयनेच्या काठचा भाग सुपीक होता. तर घाटमाथा नेहमी दुष्काळी राहिलेला भाग होता. पाऊस जर चांगला पडला तर पिके येत होती. परंतु सगळी शेती जिराईत होती. ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, हरभरा, उडीद इ. पिके शेतकरी घेत असत,जर का पावसाने दगा दिला तर भयाण दुष्काळ पडत होता. दुष्काळांत असंख्य माणसं मुंबईला गिरणीत कामाला जात होती. तिथे चार पैसे मिळवीत आणि आपल्या घरी पाठवून देत होती.
असंख्य गावात प्यायलाही पाणी मिळत नव्हते. ज्यांच्या विहिरीला पाणी असायचे तिथे लोक घागरीची रांग लावून बसत, आणि रांगेने पाणी घेत होते.
दिवसभर शेतात राबायचं एक वर्षी असाच भयाण दुष्काळ पडला. दिवाळीनंतर पाऊस जो गेला तो पुनः आलाच नाही.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांचे आजोबा स्व.मारुती कदम हेही रांगेत घागर लावून बसलेले होते. एक दिवस संपला, नंबर आलाच नाही. रात्र झाली. अंधार पडला. स्व.मारुती कदम तेथून काही हलले नाहीत. विहिरीच्या वरच्या बाजूला सपाट अशी जागा होती. तिथे ते झोपी गेले. झोपताना लोकांना म्हणाले, “गड्यांनो, माझा नंबर आला म्हणजे मला सांगा.” मध्यरात्रीनंतर केव्हातरी त्यांचा नंबर आला. लोकांनी त्यांना हाक दिली. दिवसभराच्या कामांनी ते गाढ झोपेत होते. हाकेने ते जागे झाले. पण आपण कुठे आहोत हे त्यांना कळले नसावे. तोल गेला व ते वरून विहिरीच्या तळाशी आदळले, आणि त्याच क्षणी त्यांचं निधन झालं. पाणी आणण्यासाठी गेलेल्या आजोबांचा मृतदेह पहाटे घरी जेव्हा आला, तेव्हा साऱ्या सोनसळात हलकल्लोळ उठला.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांनी आपल्या आजोबांची वडीलांची परिस्थिती पाहीली होती. ती अणुभवली होती. त्या प्रवाहातून जाताना साहेबांनी सुद्धा कुळव चालवणे, नांगराच्या मागे गडी म्हणून काम करणे, भांगलायला जाणे ही सर्व कामे केली होती. शेतीबरोबर घरी सुद्धा. कामे करावी लागत.
साहेबांचे शाळेत जाण्याचं वय झालं. वडीलांनी म्हणजेच तात्यांनी त्यांना सोनसळच्या प्राथमिक शाळेत घातलं. शाळा चौथीपर्यंत होती. एकूण विद्यार्थी-संख्या ६०-७० च्या घरातही नव्हती.
चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तात्यांनी साहेबांना शिरसगावच्या प्राथमिक शाळेत घातलं.
१९५५ साली साहेब या शाळेतून फायनलची परीक्षा पास झाले.
सांगली जिल्हयाच्या या दुष्काळी छायेत वावरणाऱ्या भागातील शेतकऱ्याला ऊर्जितावस्था यावी, त्याला दुष्काळाशी टक्कर देता यावी आणि हळूहळू त्याला दुष्काळी छायेतून बाहेर काढता यावे यासाठी डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी सतत प्रयत्न केले.
सांगली जिल्हयाच्या दुष्काळी भागाचा कायापालट करणाऱ्या कृष्णा-कोयना उपसा जलसिंचन योजनेस (ताकारी योजना) गती देऊन ही योजना प्रत्यक्षात उतरावी यासाठी साहेब विधानसभेत वारंवार यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करीत होते.
विधानसभेत या प्रश्नावर त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे.
आज टेंभू ताकारी, म्हैसाळ या योजना गतिशील झालेल्या आहेत.
कडेपूर, देवराष्ट्रे येथे ताकारी योजनेची उपविभागीय कार्यालये त्यांच्याच प्रयत्नांनी उभी राहिली.
एका शेतकरी कुटुंबातील १९-२० वर्षाचा तरुण भारती विद्यापीठासारखी संस्था उभी करण्याचे धाडस भागातील तरूणांना नोकरी देण्याच एवढे मोठ काम करू शकतो. तो तरूण आपला भाग दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न बघत होता. आणि ते स्वप्न पुर्ण केले. तर त्या लहान वयात मोठ मोठी स्वप्न पाहणाऱ्या तरूणाची तुलना आपण कशासी करणार,…..डॉ पतंगराव कदम साहेब प्रतिष्ठान फेसबुक पेज वरून