वसगडे हद्दीतील “तो” मृतदेह कोणाचा ? : भिलवडी पोलिस ठाण्याचे आवाहन
भिलवडी पोलिस ठाण्याचा कसोशीने प्रयत्न : सुज्ञ नागरिक म्हणूनही कर्तव्य बजावूया

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारे खटाव -वसगडे येथील कॅनॉलमध्ये काही दिवसांपूर्वी अंगावर फक्त अंडरवेअर अवस्थेत असलेला मृतदेह आढळला होता. मृतदेह कोणाचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अद्याप कोणीही ओळख पटवण्यासाठी आले नाही. यासाठी भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी ज्या लोकांची मिसिंग केस असेल त्यांनी ओळख पटवण्यासाठी भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
भिलवडी पोलिस ठाणे अ.म.र.नं १७/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दिनांक १४.०५.२०२४ रोजी दाखल असलेल्या सोबत जोडलेल्या फोटो मधील अनोळखी इसम अंदाजे ४० ते ४५ वर्षे हा पोलिस ठाणे हद्दीत मृत अवस्थेत मिळाला. भिलवडी पोलिस ठाणे हद्दीत शोध घेवुन नमुद अनोळखी इसमाबाबत आपले पोलिस ठाणे अभिलेखावर असलेल्या मिसींग व्यक्तीची पडताळणी करुन काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.१. मयतेचे नाव अनोळखी इसम वय अंदाजे ४० ते ४५
२. वर्णन : वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, पुरुष जातीचे, चेहरा कुजलेला दोन्ही हात पाय काळवंडलेले,
अंगात निळ्या रंगाचा बरमुडा, डाव्या पायात काळ्या रंगाचा विनलेल्या दोन्याचा कंडा.
३. मयत घटना ता वेळ ठिकाण दिनांक १४.०५.२०२४ रोजी सकाळी १०.५५ वा चे पुर्वी वसगडे गावचे हद्दीत शिवाजी ऊर्फ शशीकांत बाळासो पाटील यांचे शेत जमीन गट नंबर ६७२ मधील पडीक जमिनीमध्ये काट्याच्या झाडात आढळून आला.
. हकीकत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचे अनोळखी पुरुष ४ जातीचे मयत कोणत्यातरी अज्ञात कारणाने मयत झालेले सडलेल्या/कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने वरील प्रमाणे अकस्मात मयत रजिस्टर दाखल करणेत आलेले आहे. पोस्ट मार्टेम झाले अगर कसे पोस्ट मार्टेम झाले आहे.
मयतेच्या अंगावर जखमेच्या खुणा नाहीत
. १. तपास अधिकारी नितीन सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिलवडी पोलिस ठाणेमो नं :- 98927 84429
पोलिस शिपाई विशाल पांगे : मो नं.- 90218 78799
२. दुरध्वनी क्रमांक भिलवडी पोलीस ठाणे 02346 237 233
या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे.
या अनोळखी पुरूषाचा मृतदेह सापडल्या नंतर भिलवडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत प्रयत्न केले आहेत. आपण सुज्ञ नागरिक म्हणूनही आपलं कर्तव्य पार पाडूयात.