महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीयसामाजिक
सांगली- मिरज रोड वरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू करावे : जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम
सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ; लोकांमध्ये समाधान

विषय – सांगली मिरज रोड वरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, सांगली मिरज रोड वरील मारुती मंदिर शेजारील उड्डाण पुलाचे काम मंजुर असून बरेच दिवस झाले प्रलंबित आहे.पुलाचे काम चालू करण्यासाठी पर्यायी पूल तयार करणे महत्वाचे आहे. पहिल्यांदा वाहतुकीसाठी पर्यायी पूल तयार करून मुख्य पुलाचे काम लवकरात लवकर चालू करावे. या पुलाचे काम झाल्यानंतर लोकांची गैरसोय दूर होणार आहे, त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा ,अशी विनंती ही प्रदेशाध्यक्ष समिती दादा कदम यांनी मंत्री महोदयांकडे केली आहे.