महाराष्ट्र
स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त क्रांतीज्योत निघणार ; जैलाब शेख

मिरज : मिरज येथील मनेर हॉल बसवेश्वर चौक येथे दिनांक 7/11/2023 रोजी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांनी मीटिंग बोलवलेली होती येणाऱ्या 20/11/2023 तारखेला महान देशभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त क्रांती ज्योत रॅली सालाबाद प्रमाणे गेली अकरा वर्ष निरंतर निघत आहे.तसेच रॅलीची सुरुवात मिरज लक्ष्मी मार्केट, मिरज शहर पोलीस स्टेशन,मंगल टाकीज,भंडारीबाबा दर्गा चौक, हजरत खाजा शमणा-मीरा दर्गा मार्गे स्टेशन,ए.पी बेकरी मार्गे, स्टेशन पोलीस चौकी मिरज स्व अहमदबाशा चौक सिटी बस स्टॅन्ड शेजारी येथे फोटोला हार अर्पण करून रॅलीची सांगता होउन.महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. शी माहिती यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांनी दिली