गुगवाड येथील ‘धम्मभूमी’ प्रथम वर्धापन दिन, धम्मपरिषद उत्साहात : हजारो नागरिकांची उपस्थिती ; उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे कौतुक
भदंत बोधीपालो,भदंत उपगुप्त यांची उपस्थिती

जत (गुगवाड) :-
गुगवाड येथे उद्योगपती मा.सी.आर.सांगलीकर यांनी अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि अॕड. सी.आर.सांगलीकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२नोव्हेबर २३ रोजी आयोजित केलेला ‘धम्मभूमी’ विहाराचा प्रथम वर्धापन दिन आणि धम्मपरिषद सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो नागरिक उपस्थित होते. अतिशय उत्कृष्ट सोहळ्याचे नियोजन केल्याबद्दल उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे कौतुक होत आहे
या सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक,पंजाब,राजस्थान,दिल्ली आदी राज्यांतील बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.हा कार्यक्रम दोन सत्रात पार पडला.
प्रथम सत्राची सुरुवात अथर्व चंद्रकांत सांगलीकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भदंत डॉ. बोधीपालोजी महास्थविर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली.यानंतर महाविद्यालय ते गुगवाड गाव या मार्गाने गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब यांचा जयघोषात धम्मरॅली धम्मभूमी महाविहारात आली.रॅली धम्मभूमी परिसरात आल्यानंतर भदंत डॉ. उपगुप्त महास्थविर यांच्या हस्ते भिख्खू संघाच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.नतर बोधी वृक्षाची पूजा करून ‘धम्मभूमी’ विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.तसेच भिख्खू संघ, उपासक,उपासिका यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली.यानंतर भिख्खू संघाला भोजन दान देण्यात आले.
दुसऱ्या सत्रातील धम्म परिषदेची सुरुवात भदंत डॉ बोधीपालोजी, भदंत डॉ उपगुप्त जी,भदंत यश काश्यपायन, सांगलीकर दांपत्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.उपासिका संघाने क्षमा याचना केली.यानंतर मा.सागलीकर साहेबांनी इच्छुक उपासकांना कन्नड भाषेतून तर तृप्ती घोलप यांनी मराठीतून २२ प्रतिज्ञा देऊन दिक्षा दिली.
यानंतर भदंत यश काश्यपायनजी, भदंत उपगुप्तजी,बोधीपालोजी, यांनी सुंदर धम्मदेसना दिली.समारंभाचे प्रमुख वक्ते मा.प्रविण गांगुर्डे यांनी भावनिक समतोल जोपासने : भावनिक कल्याणमध्ये बौद्ध धम्माच्या विचारांचे अनुकरण करने या विषयावर मनोगत व्यक्त केले.प्रा.डाॅ.जगन कराडे यांनी ठराव वाचन केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक मा.सागलीकर यांनी केले तर आभार दयानंद कांबळे यांनी मानले.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब सांगलीकर, रमेश कांबळे, बसवंत काटक सर, विजय कांबळे, दिपक कांबळे, प्रदीप कांबळे, महेश शिवशरण,किरण पाटील, सचिन इनामदार, रविंद्र खांडेकर,नागराळेचे अमर कांबळे,अथणीचे रवी कांबळे, लिंगनूरचे कुमार बनसोडे,नरवाडचे दर्शन कांबळे यांच्यासह नागराळे, एक्संबा, हिरेकुडी, गिरगाव, नरवाड, विजयनगर,कोळे, तमदलगे,लिंगनूर, गुंडेवाडी,भोसे,सोनी,आरग,मिरज येथील स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.