दुधोंडीच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही : महेंद्र आप्पा लाड
दुधोंडी येथे विविध विकासकामाचे कामाचे भूमिपूजन

(दुधोंडी): –
दुधोंडी परिसराच्या विकासासाठी जे. के.जाधव यांचा सतत पाठपुरावा सुरू असतो. त्यांच्या सतत रेट्यामुळे आम्हाला ते जे विकासाचे काम सांगतात, ते पूर्ण करावे लागते. इथून पुढेही ते जे काम सांगतील ते पूर्ण करू. दुधोंडीच्या विकासकामांत मागेही स्वर्गीय पतंगराव कदम कधीच कमी पडले नाहीत. इथून पुढेही महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री विद्यमान आमदार डॉ. विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नसल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी दूधोंडी गावामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करताना मत व्यक्त केले.
ते मौजे दूधोंडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या अंतर्गत बेघर वसाहत वसंतनगर येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच दूधोंडी गावामधील मातंग वस्ती या ठिकाणी आर सी सी गटर बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
महेंद्र लाड म्हणाले की, दुधोंडी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार, ग्रामपंचायतीची भव्य इमारत याबरोबरच अन्य कामासंदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरू आहे, तीही कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ पुणे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, जे के बापू जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी इंजि. मिलिंद जाधव, लोकनियुक्त सरपंच उषा देशमुख, शाखा अभियंता वैभव पाटील, माजी सरपंच विजय आरबूने, ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, तानाजी नलवडे, बब्बर मुजावर, कुमार साळुंखे, सविता कदम, दुर्गा जाधव, रवींद्र आरबूने, माजी उपसरपंच रवींद्र नलवडे, हनिफ मुजावर, सतिया धनवडे, हिंदुराव कदम,आनंदा आरबूने, श्रीपती कोळी, शामराव देशमुख, सुरेश रानमाळे, सचिन मोहिते, सदाशिव कदम, विकास भोसले, जोतिराम साळुंखे, श्रीकांत कदम, सुदाम ठिक, संदीप पाटील, आनंदराव कदम, मधुकर नांगरे, दिलीप जाधव, डॉ विजय जाधव, हणमंत करंडे, अनिल आरबूने, रघुनाथ जाधव, रमेश देशमुख, शंकर जाधव, शरद मोरे, बाळासाहेब पवार, ग्रामसेवक प्रकाश माळी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.