भिलवडी येथील उद्योजक गिरीश चितळे यांची जायंट्सच्या विशेष समिती सदस्यपदी निवड
भिलवडी जायन्ट्स ग्रुपकडून सत्कार ; अनेकांकडून कौतुक अन् अभिनंदन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील
उद्योजक कै. काकासाहेब चितळे यांनी जायन्टसच्या माध्यमातून जी सामाजिक चळवळ उभा करून विविध सामाजिक उपक्रम राबवून महाराष्ट्रामध्ये एक नवीन ठसा उमटवला, त्यांचाच वारसा चालवत त्याच मार्गावर वाटचाल करणारे फेडरेशन २क चे माजी अध्यक्ष आदरणीय श्री.गिरीशजी चितळे यांची जायंटस् वेलफेअर फौंडेशन च्या विशेष समिती सदस्य पदी निवड झाली . त्यांच्या या निवडीबद्दल भिलवडी जायन्ट्स ग्रुपने त्यांचा सत्कार आयोजित केला. या समारंभाचे स्वागत आणि प्रस्ताविक जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर यांनी केले तर गिरीश चितळे यांचा सत्कार श्री रमेश पाटील श्री महावीर चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक मकरंद चितळे, सुहास खोत, श्री प्रदीप माने, सुनील परीट, बाळासो महिंद, पार्श्वनाथ चौगुले, सुधीर गुरव, उत्तम मोकाशी, के आर पाटील, रोहित रोकडे, बाहुबली चौगुले, अमोल मगदूम, राजीव कदम, डी आर कदम, रुपेश करपे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीमुळे भिलवडी आणि परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कार्यक्रमाच्या शेवटी के आर पाटील सरांनी आभार मानले .