सांगली येथे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सांगली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक निता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. विकास खरात, राजीव शिंदे, अजयकुमार पवार, दादासाहेब कांबळे, डॉ. स्नेहल कनिचे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, पोलीस बँड, श्वान, निर्भया, बीडीडीएस, आदी पथकांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
सांगली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, यांच्यासह तहसिलदार व विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.