सांगली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 41 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त
सांगली 16 मार्चपासून 44 – सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये आचारसंहितेची कडक अमंलबजावणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अवैध मद्य उत्पादन व विक्री व साठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आजअखेर एकूण 14 लाख रूपयांची 30 हजार रुपये इतक्या किमतीची एकूण 2 हजार 526 लिटर इतकी दारू जप्त तर 12 हजार, 80 लीटर इतका हातभट्टी निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल (रसायन) जागीच नष्ट करण्यात आलाअसल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 467 लीटर देशी, 470 लीटर विदेशी, 1344 लीटर हातभटटी, 145 लीटर ताडी तर 100 लीटर बिअर, जप्त करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदी संदर्भात एकूण 87 गुन्हे नोंदविले असून अवैध मद्य वाहतुकीच्या अनुषंगाने सुमारे 27 लाख 42 हजार रुपये इतक्या किंमतीची 15 वाहने जप्त केली आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजअखेर 41 लाख 72 हजार इतक्या किंमतीचा माल जप्त केला असल्याचे परिपत्रकाव्दारे सांगितले.