एम.सी.ई.डी.मार्फत विरार येथे चर्मकार समाजासाठी निःशुल्क उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन

मुंबई प्रतिनीधी-:
उद्योग संचालनालय- महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत पालघर जिल्ह्यातील चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता भाऊसाहेब वर्तक सभाग्रुह ,साईबाबा मंदिर जवळ, विरार (प.) येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील युवक आणि युवतीना मोफत दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे
याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी.पालघर यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार,मोची युवक-युवती आणि महिलांकरिता ३० दिवसीय मोफत अनिवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आणि १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित आहेत. या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा,यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्वंकष मार्गदर्शन,उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा यासह उद्योग उभाणीसाठीच्या विविध विषयांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महामंडळाच्या योजना आणि इतर सहकारी योजनांच्या लाभ घेता येईल.
याची सविस्तपणे संपूर्ण माहिती सदरील विरार येथील मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमात देण्यात येणार असून त्याठिकाणी मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त चर्मकार बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी एम. सी.ई.डी.मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.