महाराष्ट्र
माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
सांगली जिल्हा, महाराष्ट्र्सह देशात काँग्रेस पक्ष, भीम शक्ती संघटनेचा जल्लोष

सांगली: माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. खासदारपदी निवड झाल्याने सांगली जिल्हा, महाराष्ट्र्सह देशात काँग्रेस पक्ष, भीम शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. सांगली येथे भीम शक्ती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ माने यांनी आणि इतर कार्यकर्ते यांनी अनेक ठिकाणी निवडीचे फलक लावले आहेत.