भारती बझार भिलवडी शाखेच्या हळदी कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
विजयमाला (वहीनीसाहेब) पतंगराव कदम यांची उपस्थिती

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भारती बझार भिलवडी शाखेच्या वतीने बुधवार,दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जि.प.प्राथमिक मराठी शाळा, अमृत चौक, पाटील गल्ली, भिलवडी येथे हळदी कुंकू समारंभ भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला (वहीनीसाहेब) पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासोबत महिलांसाठी मनोरंजनाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच स्पर्धा परीक्षा मधून निवड झालेल्या कुमारी शैलजा चव्हाण,कुमारी पूजा माने तसेच महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याबद्दल सौ.जयश्री घोडके
यांचा आदरणीय वहिनीसाहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी
निमंत्रित केलेल्या अंकलखोप आणि भिलवडी जि.प.गटातील महिला सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या, जि.प.,पंचायत समिती, राजकीय महिला पदाधिकारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भिलवडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. विद्याताई पाटील यांनी विजयमाला पतंगराव कदम (वहिनीसाहेब) यांचे स्वागत केले. भिलवडी ग्रामपंचायतच्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने पंचक्रोशीतून आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भिलवडी गावच्या सरपंच सौ.विद्याताई पाटील, भिलवडी स्टेशन गावच्या सरपंच सावित्री काकी यादव,अंकलखोप गावच्या सरपंच बेबीताई पाटील,खंडोबाचीवाडी गावच्या सरपंच सौ.अश्विनीताई मदने, चोपडेवाडी गावच्या उपसरपंच सुप्रियाताई माने, माजी जि.प.सदस्या भारतीताई गुरव, धनगावच्या माजी जि.प. सदस्या सौ.अरुणाताई कुर्लेकर, नागठाणेच्या माजी सरपंच सौ. जयश्रीताई मांगलेकर,माजी सरपंच सौ.वृषालीताई पाटील, संतगावच्या माजी सरपंच सौ.माधुरीताई सावंत, भिलवडीच्या माजी सरपंच स्वप्नाताई चौगुले, माजी सरपंच शारदा काकी पाटील,पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्षा सौ.प्रणालीताई पाटील या सर्व मान्यवरांचे सौ.सीमा शेटे व भारती बझारचे जनरल मॅनेजर जगन्नाथ शिंदे मामा यांनी आभार मानले.