मस्तवालांची नांगी ठेचण्यासाठीच शिव मल्हार क्रांती सेना : आमदार गोपीचंद पडळकर
भिलवडी येथे महाराष्ट्रात हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना स्थापनेची घोषणा : ऋषी भैय्या टकले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

भिलवडी :- अभिजीत रांजणे
हिदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना ही संघटना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आहे .ही संघटना गाव गाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे .सरकारच्या सुविधा , सरकारी योजना ‘ किंवा गावात काही लोकं दादागिरी विनाकारण करत आसतील तर त्या सगळ्या अन्यायग्रस्त लोकांना आधार देण्यासाठी ही संघटना काम करेल .जर एखादा कुठलाही नराधम गाव गाड्यांमध्ये मस्तावल पणा करत असेल तर त्याची नांगी ठेचण्यासाठीच हि संघटना लढणार आहे . असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यानी केले . ते सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेच्या शाखांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते .
आमदार पडळकर पुढे म्हणाले ‘
पलूस तालुक्यामधील गावागावामध्ये अनेक शाखांचे उद्घाटन केले आहे.
ऋषी टकले यांची टिम चांगले काम करीत आहे .
त्यांनी खूप मेहनत घेतली आहे . दोन-तीन महिन्यापासून त्यांचे काम सुरू आहे .
ऋषी टकले यांनी संघटनेला इतकं वाहून घेतलंय की आज त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आणलं आहे .
गावात कुठलाही पेशंट असेल आणि त्याला मदतीची आवश्यकता असेल लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये आपण मुख्यमंत्री निधीतुन मदत करु .
आज गावागाड्यांमध्ये अकरा पकड जाती आणि बारा बलुतेदार पूर्वीची पद्धत होती . ती पद्धत पूर्वीची सगळी बंद झाली परंतु आता केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे .आणि या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गाव गाड्या मधला जो मूळचा सुतार आहे .लोहार आहे .कुंभार आहे .नाभिक आहे .शिंपी आहे .जे सगळे गावातले जुने जे बारा बलुतेदार आणि म्हणत होतो त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गावातला एक ही माणूस त्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे संघटनेच्या माध्यमातून घेऊ . सगळ्या लोकांना त्या योजनेचा लाभ करून देण्यासाठीची ही आमची संघटना आहे .संघटनेच्या सगळ्या शाखाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणं आमच्या संघटनेचे धोरण आहे . प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून देणे हे आमचे काम आहे .
आज गाव गाड्यातल्या लोकांच्यासाठी आपण पोषक वातावरण या संघटनेच्या माध्यमातून या टीमच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला करायचा आहे .
गाव गाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून ओबीसी मायनर ओबीसी दलित समाज भटके मुक्त समाज गरीब मराठा समाज या सगळ्या मुलांना आम्ही एकत्रित करू आणि जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्त्वावरती सगळ्या लोकांना मी न्याय मिळवून देऊ .
अन्याय करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एक मोठं संघटन आपण या निमित्ताने निर्माण करतोय तर ते संघटन एक दिवस महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं अराजकीय संघटन असेल . असे मत भिलवडी येथील सभेमध्ये आ .गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले .यावेळी माजी जि.प. सदस्य कुंडलिक ऐडके ‘सुरेंद्र वाळवेकर , नितिन नवले ‘ माजी उपसरपंच मोहन तावदर ‘ प्रमोद आबा ‘सुरेश पाटील ‘ संदिप सरकल’ सागर लुगडे . चॅलेंजर्स दिपक पाटील कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विजय वावरे सुत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे तर आभार ऋषी टकले यांनी मानले .
हिंदुस्थान शिवम्हलार क्रांती सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी ऋषी टकले यांची निवड .गोपीचंद पडळकर यांनी केली व त्यांचा सत्कार केला .
या कार्यक्रमास भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांनी जोमाने काम केले होते.
पंचवीस ठिकाणी एकाच दिवशी हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हा नवा इतिहास रचला असेच म्हणावे लागेल, अशा लोकांमधून प्रतिक्रिया करण्यात येत होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. या लोकांचे हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांनी आभार मानले.