हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील वीज मंङळाचा लाईनमन रज्जाक हूसेन तांबोळी याला 5 हजाराची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकङले

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉट्रॅक्टर असून त्यांचे ग्राहक यांना पॉवर लुम सुरु करण्याचे असून त्यासाठी 26 HP चे पॉवर लुम कनेकशन मिळणेसाठी अर्ज केला होता. आरोपी रज्जाक हूसेन तांबोळी वय 50 वर्ष पद लाईनमन म.रा.वि.म शाखा चंदूर ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर. रा. हूसेन मंजिल बंगला” भारतनगर”इदगा जवळ”” गल्ली नंबर 1 मिरज.आणी आकाश शंकर किटे वय 33 पद बाह्यस्त्रोत कर्मचारी म.रा.वि.म. शाखा चंदूर ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर. रा. धूळेश्वर नगर गल्ली नं 5 कबनूर ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर. यांनी तक्रारदार यांना इलेक्ट्रिक पोल वरून मीटर पर्यंत लाईट जोडणी साठी 7000 रु ची लाच मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वी कोल्हापूर येथील कार्यालयाकङे दिली होती.
आरोपी क्र . दोन आकाश किटे यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी आरोपी क्र 1 रज्जाक हूसेन तांबोळी यांचेसाठी 3000 रु ची मागणी केली.
आरोपी क्र 01 यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी 5000 रु ची मागणी
केली. त्यानंतर आरोपी क्र 01 यांनी तक्रारदार यांचेकडुन 5,000/- रुपये स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, आरोपी यांचेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे,इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक
पो.हे.कॉ.अजय चव्हाण,
पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर,
पो.ना.सुधीर पाटील,
पो.कॉ.कृष्णा पाटील,
चा.पो.हे.कॉ.कुराडे,
आदीनी सापळा रचून केली.