लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे आवश्यक ; प्रा. डॉ. प्रकाश पवार.
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ICSSR नवी दिल्ली पुरस्कृत "जागतिकीकरणाचा भारतीय लोकशाही वरील परिणाम" या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

दर्पण न्यूज पलूस ; डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ICSSR नवी दिल्ली पुरस्कृत “जागतिकीकरणाचा भारतीय लोकशाही वरील परिणाम” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक 19 व 20 मार्च 2025 रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रकाश पवार विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, हे बोलत होते .
चर्चासत्राचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. महेंद्र (आप्पा) लाड व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. जे. के (बापू) जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली च्या आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास केंद्राचे प्रा. डॉ. रोहन चौधरी बीजभाषक म्हणून लाभले. तसेच प्रा. डॉ. शिवाजी पाटील विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, प्रा. डॉ. प्रकाश पवार विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व प्रा. डॉ. सुनील कनकटे प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग जी डी सावंत कला वाणिज्य व बीसीएस वरिष्ठ महाविद्यालय नाशिक आदि साधन व्यक्ती म्हणून लाभले, चर्चासत्राचे मुख्य संयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. यु. व्ही पाटील यांनी केले, तर चर्चासत्राचे संयोजन राज्यशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. शीतल पाटील, प्रा. शैलेश कांबळे, प्रा. सरिता निकम व प्रा. राजेश पवार यांनी केले .
याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते