महाराष्ट्र

अंकलखोप ग्रामस्थांच्यावतीने जे.के. (बापू) जाधव यांचा जाहीर सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड : अनेकांची भावनात्मक भाषणं

 

अंकलखोप :
” कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव, यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड फारच उशिरा झाली. त्यांचे सामाजिक आर्थिक सहकार योगदान आदर्शवत आहे. असे गौरवद्गार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा
श्रीमती सरोज (माई) पाटील यांनी काढले.अंकलखोप व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने जे.के. (बापू) जाधव यांचा जाहीर सत्कार अंकलखोप विकास सोसायटी समोर झालेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुन्या म्हणून बोलत होत्या. सुरवातीला जे.के. जाधव यांचे जोरदार वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. विविध संस्था व व्यक्तींनी श्री. जाधव यांचा सत्कार केला.

श्रीमती पाटील म्हणाल्या ” जे . के . बापू यांचे लहानपणापासून खडतर परिस्थितीत दिवस गेलेले आहेत . त्यातून त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, मजूर वर्ग यांच्यासाठी विविध संस्था , बुक, दूध संघ स्थापन करून त्या आदर्शपणे चालवल्या आहेत. अनेकांच्या हाताला त्यांनी काम दिले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सेवक व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीने बळ मिळेल.”

स्वागत अजितराव शिरगावकर यांनी केले. प्रास्ताविक करताना जे. के. आप्पा पाटील यांनी जे. के. नावाचा फायदा कसा झाला याची गोष्ट सांगितली. जे.के. जाधव यांच्या नावाचा दबदबा शासकीय कार्यालयामध्ये आहे. कोठेही जाऊ शकतात अनेकांनी त्यांच्या मदतीचा अनुभव घेतला आहे त्यामुळेच त्यांना संपूर्ण तालुक्यात मानले जाते, ओळखले जाते असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना जे .के . बापू म्हणाले, ” अनेक पुरस्कार मिळाले. रयत शिक्षण संस्थेत या पदावर काम करण्यास मिळणे भाग्याचे आहे . अंकलखोप येथे झालेल्या जोरदार स्वागत व सत्कार समारंभाने भारावून गेलो आहे . सत्कार समितीने केलेले आयोजन व प्रेम विसरणार नाही. आपल्या ऋणात राहणे पसंत करेन. ”
यावेळी रयतचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के , प्रा. डी. ए. माने, प्रा.अनिल फाळके , प्रा. बी.एस.जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमास रयतचे माध्यमिक विभाग सहसचिव प्राचार्य बी. एन पवार , ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य गणपतराव तावरे (बारामती) , सुधीर जाधव, सतपाल साळुंखे, रयत परिवारातील प्राचार्य , प्राध्यापक , शिक्षक , सेवक , अंकलखोप ग्रामपंचायत सदस्य , विकास सोसायटीचे संचालक, अंकलखोप, नागठाणे , संतगाव , सूर्यगाव , दुधोंडी, पलूस परीसरातून विविध संस्थांचे पदाधिकारी नेतेमंडळी उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याचे नियोजन अतिशय उत्कृष्ट करण्यात आले होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!