कोल्हापूरातील इचलकरंजी येथील सन्मती बँकेच्या कोल्हापूर शाखेचा स्थलांतरसोहळा संपन्न

कोल्हापूर : अनिल पाटील
इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा शाहूपुरी येथे स्थलांतरण सोहळा पार पडला. जगद्गुरु जगदभूषण स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते व चेअरमन सुनील पाटील, व्हाईस चेअरमन एम. के. कांबळे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
सौ. व श्री आप्पासाहेब कुडचे यांच्या हस्ते महास्वामींचे पाद्यपूजन करण्यात आले. महास्वामींनी याप्रसंगी बँकेच्या कामकाजाविषयी कौतुक केले, तसेच शुभेच्छा दिल्या. १९९६ मध्ये सुरू झालेल्या सन्मती बँकेचा विस्तार हा कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या तेरा शाखा आहेत. ग्राहकांना आधुनिक डिजीटल सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना डोअरस्टेप सुविधा, आरटीजीएस, एनईएफटी अशा विविध सुविधा पुरविल्या जातात. बँकेच्या एकूण ठेवी ३४६ कोटी आहेत. कर्ज वाटप २२६ कोटी रुपयांचे आहे. बँकेची गुंतवणूक १३१ कोटी इतकी आहे.
याप्रसंगी बी.ओ.एम चेअरमन अजित कोईक, संचालक प्रा. ए. जे. पाटील, संजय चौगुले, आण्णासो मूरचिठ्ठे, डॉ. अरुण कुलकर्णी, सी. ए. पाटील, डॉ. आप्पासो होसकल्ले, वसुंधरा कुडचे, सीईओ अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समीर मैंदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार, डेप्युटी जनरल मॅनेजर हेमलता पाटील, ऑडिट मॅनेजर अंनत पुजारी, शाखाधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.