ब्रम्हनाळ येथे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, ग्रामपंचायत ब्रम्हनाळ यांच्या आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे मोठे सहकार्य

भिलवडी : – सांगली जिल्ह्यातील
ब्रम्हनाळ ता.पलूस येथे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल व ग्रामपंचायत ब्रम्हनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व रक्त तपासणी शिबीर संपन्न झाले. यामध्ये १५० ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जनवैद्यक शास्त्र विभागामार्फत कुटुंब दत्तक कार्यक्रमांतर्गत हे शिबीर आयोजित केले होते. वय वर्षे ७ ते ७० पर्यंत सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मधुमेह व रक्तक्षय यांसारख्या विविध आजारांसाठी मोफत उपचार केले. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे सहकार्य लाभले. ब्रम्हनाळ सरपंच गीता गायकवाड, उपसरपंच सुभाष वडेर व सर्व सदस्य, जनवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुरेशी, प्रा.डॉ.गिरीश धुमाळे, डॉ. आखिला राव, डॉ. राजश्री कोटावडेकर, डॉ.शोभना पुरोहित, डॉ.नबीर यांच्यासह विकास गस्ते, मनोज पाटील उपस्थित होते.