शेतकरी संघटनेचे नेते इकबाल दादासो जमादार यांचे निधन

दर्पण न्यूज पलूस :-
शेतकरी संघटनेचे नेते इकबाल दादासो जमादार यांचे मंगळवारी सकाळी 10:00 वाजता निधन झाले. शेतकरी संघटनेचे धाडशी आणि करारी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मृत्यू समयी ते 72 वर्षाचे होते.
वाळवा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष इकबाल जमादार यांनी शरद जोशी यांच्या संघटनेत रघुनाथ दादा पाटील यांच्या बरोबरीने शेतकरी संघटनेत कार्य केले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ते राहिले.शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनात त्यांनी रघुनाथ दादा यांच्या बरोबरीने कार्य केले. वाळवा तालुक्यात शेतकरी संघटना बांधली. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना अटक झाली होती अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्यावर बोरगाव येथील कब्रस्तान मध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोरगाव येथील मुस्लिम बांधव,वाळवा तालुका तसेच सांगली जिल्ह्यातून बरेचसे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर बोरगाव आणि परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेतेमंडळी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आधी पासून ते शेतकरी संघटनेत कार्यरत होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.जियारत विधी गुरुवारी सकाळी दहा वाजता बोरगाव येथे होणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी इकबाल जमादार यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी रवींद्र रघुनाथ राव पाटील
माणिकराव पाटील बोरगाव,धनपाल माळी पेठ
शंकर मोहिते,संदीप पाटील,लक्ष्मण पाटील
भाऊसाहेब पवार तडसर,परशुराम माळी, उदयसिंग पाटील, शब्बीर जमादार, शकील मुलाणी, बशीर मुल्ला,बाळासाहेब मगदूम,रवींद्र पिसाळ,यांच्या सह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली