देश विदेश

‘सना’ चित्रपटाची कथा एका महत्त्वाकांक्षी स्त्रीभोवती फिरते : अभिनेत्री पूजा भट्ट

 

गोवा/पणजी अभिजीत रांजणे :-

 

स्त्रीची गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला स्त्री असण्याची गरज नाही हे सना सिद्ध करते. दुसऱ्याच्या भावना समजून घेणे  हा महिलांचा विशेषाधिकार नाही, असे अभिनेत्री पूजा भट्ट यांनी सांगितले. गोव्यात 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. 54व्या इफ्फी मध्ये प्रतिष्ठित सुवर्णमयुरसाठी इतर 12 चित्रपटांसोबत स्पर्धा करणार्‍या 3 भारतीय चित्रपटांपैकी त्यांचा चित्रपट ‘सना’ आहे. या चित्रपटाची कथा एका महत्त्वाकांक्षी स्त्रीभोवती फिरते जी तिच्यावर झालेल्या आघातातून बाहेर न आल्यामुळे अंतर्गत लढाईशी झुंजत आहे. गर्भपातासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संवाद होणे आवश्यक असल्याचे मतही भट्ट यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षा खात्रीने करण्यासाठी, त्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले आणि याचा सोहळा व्हावा, असे त्या म्हणाल्या.

सनाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया यांनी केले आहे. चित्रपट बनवण्याच्या त्याच्या कल्पना आणि दृष्टिकोनाबद्दल विस्तृतपणे बोलताना सारिया यांनी सांगितले की, “मला अधिकाधिक साचेबद्ध नसलेल्या  स्तरावर  जायचे होते आणि मत्सर, वर्ग आणि इच्छा या विषयांचा शोध घ्यायचा होता. त्या गोष्टी अधिक सामर्थ्यशाली होत्या. हे 3 किंवा 4 गोष्टींचे म्हणजेच लोक स्वार्थी असणे, कार्यस्थळी अयोग्य प्रकारचे संबंध आणि स्वत:बद्दल निकोप समज नसणे याचे मिश्रण आहे.” आपल्या कार्यशैलीबद्दल बोलताना सारिया यांनी सांगितले.  कलाकार आणि पडद्यामागील कलाकार एकरूपतेने काम करतात. दिग्दर्शक करू शकणारे सर्वोत्कृष्ट काम म्हणजे इतरांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सक्षम बनवताना स्वतःला दिग्दर्शित करणे.

यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांच्या इतर सदस्यांमध्ये राधिका मदान आणि निखिल खुराना यांचा समावेश होता ज्यांनी चित्रपटात काम करण्याबद्दलचे त्यांचे अनुभव देखील सांगितले. सनाची भूमिका साकारणारी मुख्य अभिनेत्री राधिका मदन हिने या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पदर  ओळखण्याचा तिचा अनुभव सांगितला. तिने या चित्रपटात सना ही एक ग्रे व्यक्तिरेखा कशाप्रकारे साकारली आहे आणि तिचे हे पात्र अनेकांसाठी कशाप्रकारे  संबंधित आहे हे तिने व्यक्त केले.

कलाकार आणि पडद्यामागील कलाकार

दिग्दर्शक: सुधांशू सारिया

निर्माता: फोर लाइन एंटरटेनमेंट प्रा. लि.

छायाचित्रण  : दीप्ती गुप्ता

संकलन : पारमिता घोष

कलाकार: राधिका मदान, शिखा तलसानिया, सोहम शाह, पूजा भट्ट, निखिल खुराना

सारांश :

जेव्हा मुंबईत काम करणाऱ्या 28 वर्षीय आर्थिक सल्लागार सनाला ती गर्भवती असल्याचे  समजते तेव्हा तिच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात मोठा आठवड्याचा शेवट अधिक गुंतागुंतीचा बनतो. गर्भपात करण्याच्या  तिच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम आहे. गर्भपाताची प्रत्यक्ष प्रक्रिया सनाला तिच्या जीवनाबद्दल पुन्हा विचार करण्यास भाग पाडेल आणि तिने घेतलेले  निर्णय खरोखरच तिचे स्वतःचे  असतील तर खोलवर विचार करेल ही कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!