देश विदेश

54व्या इफ्फीमध्ये गोवेकरांच्या चित्रपटांचे 25 पासून प्रदर्शन

 

गोवा/पणजी (अभिजीत रांजणे):-

 

इफ्फी सारख्या आंतरराष्‍ट्रीय  चित्रपट महोत्सवाची सर्वांत सुंदर गोष्‍ट कोणती तर देशाच्या विविध कोनाकोपऱ्यातून विविध भाषांमध्ये सांगितल्या गेलेल्या कथा. म्हणजे,  जणू आकर्षक काचांचे तुकडे एकत्रित आणून नक्षीदार काम असलेली देखणी कलाकृती- अर्थात चित्रपट सादर करणे होय.

यावर्षीही इफ्फीने गोवेकरांनी बनवलेल्या  चित्रपटांचे खास तयार  केलेले पॅकेज  महोत्सवामसाठी भेट दिले आहे.   या गोवेकरांच्या खास पॅकेजमधील चित्रपटांचे उद्यापासून इफ्फीच्या विविध ठिकाणी प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. गोवेकरांच्या  पॅकेजचा प्रारंभ उद्या (24 नोव्‍हेंबर, 2023) आयनॉक्स  स्क्रीन-4, पणजी येथे होत आहे. दिनेश पी. भोंसले दिग्दर्शित कोकणी चित्रपट ‘गाथन’च्या प्रदर्शन सर्वात प्रथम करण्‍यात येणार आहे.

गोवन चित्रपट  पॅकेजमध्‍ये  असलेल्या चित्रपटांची माहिती आणि त्यांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

1. गाथन

दिग्दर्शक : दिनेश पी.  भोंसले

चित्रपटाचा सारांश:

कमलाकर उर्फ तातू हा 63 वर्षांचा वृध्‍द  आणि त्याचा धाकटा भाऊ बाबुल्गो (58) यांचे एकमेकांशी खूप चांगले आहे. तातू मासेमारी व्यवसायात आहे तर बाबुल्गो मुंबईत स्थायिक आहे. तातूचा मुलगा सदा (26) हा स्थानिक बांधकाम व्यावसायिकाबरोबर काम करत असतो. तर बाबुल्गो याची  मुलगी वेदिका (25 ) अमेरिकेत काम करत असते. तिने  अमेरिकन प्रियकराशी लग्न केले आहे. तिचे अमेरिकी व्यक्तीशी केलेला विवाह  ही गोष्‍ट तातू आणि गावकऱ्यांसाठी मोठीच कामगिरी ठरली आहे. कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी बाबुल्गो नवीन दांपत्याला बरोबर घेवून  गोव्याला येण्‍याची  योजना आखत आहे. येणा-या पाहुण्यांसाठी, नवीन विवाहित दंपतीला घरी आरामदायी वाटावे, यासाठी  तातू  आवश्यक असणारी सर्व  व्यवस्था करतो. परंतु ती मंडळी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. याचे तातूला वाईट वाटते. बाबुल्गो त्याला एका  दुपारच्या जेवणाच्यावेळी नवीन जोडप्याची  भेट घडवून आणण्‍याचे वचन देतो. आर्थिक स्थिती नाजुक  असतानाही तातू शेजार-पाजरी  आणि मित्रांना आमंत्रित करून नव्या जोडीच्या स्वागताचा  कार्यक्रम आयोजित करतो. मात्र ठरलेल्या दिवशी बाबुल्गो घरी पोहोचत नाही. सदा त्याच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न करतो  पण त्यांचा फोन बंद आहे. पाहुणे जमले असल्याने तातूला काळजी वाटते आणि ते बाबुलगो आणि नवीन जोडप्याला भेटण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

प्रदर्शन  स्थळ आणि वेळ: आयनॉक्स – स्क्रीन 4, पणजी 24.11.2023: संध्याकाळी 7.00

 

2. # एमओजी (हॅशटॅगएमओजी)

दिग्दर्शक : नीलेश मालकर

चित्रपटाचा सारांश:

लिओनेल हा अनिवासी भारतीय  शेफ आहे.  आपल्या विक्षिप्त  वडिलांच्या मृत्यूनंतर स्थावर -मालमत्तेच्या काळजी घेण्यासाठी त्याला गोव्याला परत यावे  लागले आहे. आपल्या  आईच्या मृत्यूला वडिलांचा विक्षिप्तपणाच कारणीभूत आहे ही  लिओनेलची ठाम समजूत असते.  आपण कुणाच्या तरी  प्रेमात पडावं, अशी त्याच्या मनात अल्पशी आस असते. आणि त्याचवेळी  ब्रेड घरोघरी पोहोचवण्‍याचा वडिलांचा   व्यवसाय सांभाळणारी एक चुलबुली, अवखळ तितकीच फटाकडी सेलिना लिओनेलला भेटते.  सेलिना आणि लिओनेल यांच्यात शेवटी प्रेम फुलले, परंतु सेलिनाचे  वडील  तिच्या भूतकाळातील  एक  रहस्य सांगतात. सत्यस्थिती समजल्यावर सेलिनालाही  धक्का बसतो आणि ती लिओनेलशी असलेले संबंध तोडून टाकते. प्रेमाने सेलिनाच्या मनात लिओनेलला स्‍थान मिळेल की लिओनेल सर्व काही सोडून कॅनडाला परत जाईल?

प्रदर्शन  स्थळ आणि वेळ: मॅक्विंनेझ पॅलेस-1, पणजी 26.11.2023: दुपारी 2.20

 

3. क्रेझी मोगी.

दिग्दर्शक: क्रीस्ट सिल्वा

सारांश: हा चित्रपट अर्जुन आणि जोकिम यांच्या भोवती फिरतो, आणि  ते आपल्या प्रेम संबंधांमधील (लव्ह लाईफ) मधील अडथळ्यांवर रॉयच्या मदतीने कसे मात करतात, ते सांगतो. हा चित्रपट विनोदी तर आहेच, पण त्यामध्ये नात्यांची परिपक्वताही आहे. चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासात त्यातली पात्र पेम आणि जीवनाबाबतच्या नव्या दृष्टिकोनाचा शोध घेताना दिसतात.

स्क्रीनिंग (प्रदर्शन) स्थळ आणि वेळ : मॅक्विनेझ पॅलेस-1, पणजी 27.11.2023: दुपारी 2.20 वा.

 

4. मारवट

दिग्दर्शक: राजाराम गोपाळ तुरी

सारांश: मारवट हा लघुपट आंतर-जातीय विवाहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. भिन्न जातींच्या दोन व्यक्तींची ही प्रेम कथा आहे. यातली मुलगी कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या महार जातीची आहे. महार समाज बांबूच्या हस्त कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. लग्न समारंभात या हस्तकलेला मोठे महत्वाचे स्थान असते. समाजात आजही दिसून येणारे पूर्वग्रह आणि भेदभाव यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो.

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15

 

5. पीस लिली सॅन्ड कॅसल

दिग्दर्शक: हिमांशु सिंह

सारांश: जानकी मानवीला भेटते, जी तिचा पती जॉय याची आधीची पत्नी आहे. फ्लॅटच्या मालकीच्या हस्तांतरणासंदर्भातल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याबाबत त्यांच्यात झालेल्या संवादाच्या माध्यमातून, मानवीचा आपल्या घराची झलक पाहण्याचा भावनिक प्रवास सुरु होतो., आणि त्या दोघींना जीवनाचा नवा अर्थ उमगतो.

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023 : सकाळी 9.15

 

6. द विटनेस

दिग्दर्शक: ट्रॉय रिबेरो

सारांश:

गोव्यामधील पावसाळ्यात घडलेल्या या मनोवैज्ञानिक नाटकात जोआकिम हा सत्तरीचा माणूस जेव्हा आपल्या भूतकाळाची उजळणी करतो, आणि एका रहस्याचा शोध घेतो, तेव्हा त्याला एक गुपित उघड करावेच लागते. हे सत्य त्याच्या नातेसंबंधांमध्ये काही बदल घडवेल का, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून हा चित्रपट संपतो.

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 27.11.2023: सकाळी 9.15

 

7.यशोदा

दिग्दर्शक : प्रवीण चौगुले

सारांश: लेखिका माधुरी आशिरगडे ईश्वरीची कथा सांगते. एकदा लेखिका ईश्वरीला आणि सना आणि शिखा या तिच्या दोन मुलींबरोबर पाहते. चौकशी केल्यावर माधुरीला समजते की ईश्वरीने तिची आवडती सेविका हंसा, हिच्या मृत्यूनंतर त्यापैकी एका मुलीला कायदेशीरपणे दत्तक घेतले आहे. यशोदा हा लघुपट मानवतेचे सार आणि मातृत्वाची कथा सांगतो.

स्क्रीनिंग स्थळ आणि वेळ : INOX- स्क्रीन 3, पणजी 25.11.2023: सकाळी 9.15

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!