देश विदेश

गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( इफ्फी) यूकेच्या “””कॅचिंग ङस्ट””चित्रपटाने उघङणार इफ्फी’चा पङदा

गोवा पणजी-: अभिजीत रांजणे/अनिल पाटील

युनायटेड किंग्डमच्या ‛कॅचिंग डस्ट’ने ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उघडणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. स्टुअर्ट गट दिग्दर्शित हा चित्रपट एकूण १३६ मिनिटांचा आहे. राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान इफ्फीचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यात २७० हून अधिक देशी विदेशी चित्रपटांची मेजवानी गोव्यातील चित्रपट प्रेमींना मिळणार आहे.

महोत्सवाची सांगता रॉबर्ट कोलोडनी दिग्दर्शित अमेरिकन चित्रपट ‘द फेदरवेट’ या चित्रपटाने होणार आहे. तर महोत्सवाच्या मध्यावर नुरी सायलन दिग्दर्शित फ्रेंच चित्रपट ‘अबाउट ड्राय ग्रासेस’ दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात एकूण १५ चित्रपट प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पदकासाठी स्पर्धा करतील. यामध्ये गाजलेल्या ‘कांतारा’सह अन्य दोन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

मानाच्या युनेस्को गांधी विभागात १० चित्रपट दाखवण्यात येतील. यामध्ये राकेश चतुर्वेदी दिग्दर्शित ‘मंडाली’, विष्णू शंकर दिग्दर्शित ‘मलिकापुरम’ आणि सयातन घोषन दिग्दर्शित ‘रवींद्र काव्य रहस्य’ या तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय दिग्दर्शन क्षेत्रात प्रथमच उतरलेल्या सात नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. क्लासिकल रिस्टोर्ड विभागात ७ भारतीय आणि ३ आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येतील.
मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही ७५ क्रिएटिव्ह माईंड, गाला प्रीमियर, मास्टर क्लास, फिल्म बाजार, ओपन एअर स्क्रिनिंग, सिने मेला, टेक्नॉलॉजी पॅव्हेलियन, दिव्यांगांसाठी विशेष चित्रपट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय समीक्षक म्हणून दिग्दर्शक शेखर कपूर काम पाहतील. यंदा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार अमेरिकन अभिनेते मायकल डग्लस यांना जाहीर झाला आहे.

चार ठिकाणी होणार चित्रपट प्रदर्शन

यंदा आयनॉक्स पणजी, अयनॉक्स पर्वरी, मॅकेनिझ पॅलेस आणि झी स्क्वेअर सम्राट अशोक येथे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या यादीमध्ये कला अकादमीचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय विभागासाठी १०५ देशातून प्रवेशिका

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागासाठी १०५ देशातून २९२६ प्रवेशिका आल्या होत्या. तर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या वेब सिरीज (ओटीटी) विभागासाठी १० भारतीय भाषेतील ३२ प्रवेशिका आल्या आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!