महाराष्ट्र

टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी प्रयत्न करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

सांगली येथे टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देशातील पहिल्या टेलर एक्सपो 2024 चे शानदार उद्घाटन: हजारो टेलर व्यावसायिक उपस्थित

 

 

सांगली :
महाराष्ट्र राज्यांतील नव्हे तर देशातील टेलर एक्सपो 2024 चा साक्षीदार मी ठरलो हे माझं भाग्य आहे. टेलर व्यावसायिक पुरातन काळापासून आपलं काम करीत आहेत. राज्यातील टेलर लोकांसाठी मी काम राहू, तसेच टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी प्रयत्न करणार , असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथे दिले.

टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगली येथे देशातील प्रथम पहिले टेलर एक्सपो २०२४ एक्झिबिशन च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.

यावेळी सांगलीचे खासदार विशाल दादा पाटील, टेलर व्यावसायिक न्याय मिळवून देण्यासाठी मी दिल्ली येथे त्यांच्या व्यथा मांडणार. हा टेलर व्यावसायिक त्यामध्ये पुरुष आणि महिला असो यांना मदत करणार आहे. देशातील पहिले टेलर एक्सपो 2024 सांगली येथे भरवले, माझ्यादृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. एका  छताखाली टेलर लोकांना आपण चांगली संधी दिली आहे.सांगलीचा खासदार या नात्याने मला खूप समाधान वाटले, असेही खासदार विशाल दादा पाटील यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, टेलर व्यावसायिकांच्या पाठिमागे मी पहिल्यापासून खंबीरपणे उभा आहे, यापुढेही कायम उभा राहिल. टेलर एक्सपो हा खरोखरच टेलर लोकांना प्रेरणा देणारा आहे.

जनसूराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्मित दादा कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी टेलर व्यावसायिकांना न्याय देऊ त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी करणार, असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तांबोळी,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विभुते आदींनी मनोगत व्यक्त केले.

टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की,
टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गणरायाच्या पावन भूमीत सांगली नगरीमध्ये देशातील प्रथम होत असलेल्या टेलर एक्सपो २०२४ एक्झिबिशन च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेले पाहुणे आणि महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यातून व देशभरातून आलेल्या टेलर बांधवांचे भगिनींचे व उपस्थित प्रेक्षकांचे मी टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि आभार मानतो. अनाधी काळापासून म्हणजेच राजे राजवाडा च्या काळामध्ये टेलर व्यवसायाला फार महत्व होते प्रत्येक राजवाड्यामध्ये टेलर बांधवा ंना राजे लोक वेगळ्या भूमिकेतून पाहत असे. त्यांना त्याप्रमाणे न्याय देत असे. आज तो काळ जरी निघून गेला असला तरी आज रोजी ही गरिबापासून श्रीमंतापर्यंत लोकांना कपड्याचे फार महत्त्व आहे. कापड किंवा मोठा तागा कट करून त्याला वेगळी सांज चढवून लोकांना चार माणसांमध्ये कसं देखणं करण्याचं काम फक्त आणि फक्त कपड्याच्या माध्यमातून टेलर व्यवसायिक करू शकतो. टेलर आणि ग्राहक यांच्यामध्ये कसा ऋणानुबंध होईल यासाठी या सांगली नगरीमध्ये टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने टेलर एक्सपो 2024 चे आयोजन केले आहे. एक्सपो ग्राहकाला आणि टेलर व्यवसायिकांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत याच्या माध्यमातून टेलर व्यवसायिकांना नवी दिशा मिळणार आहे.

आज रोजी टेलर व्यवसाय करणारा टेलर त्यामध्ये पुरुष असेल किंवा महिला असेल या अनेक संकटाची झगडत आहे एखादी महिला टेलर व्यवसायिक असेल तर या टेलर व्यवसायावर वरती आपला घर प्रपंचा चालवते. यामुळे त्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने टेलर व्यावसायिकसाठी वेगळ्या महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली.

यावेळी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोपार्डे, असोसिएशनचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी , टेलर, महिला टेलर, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या टेलर एक्सपो ला अनेक लोकांनी भेटी दिल्या.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!