महाराष्ट्रराजकीयसामाजिक
कोल्हापूरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर :- अनिल पाटील
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनीटे आगोदर उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव सोबत कोणतीही बॅग आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.