महाराष्ट्र

विशाल दादांचा “प्रकाश” मय “विश्व” विजय..!

सांगली जिल्ह्यात जोरदार जल्लोष ; नवं पर्व होणार निर्माण; युवकांमध्ये प्रचंड उत्साह

 

भिलवडी:- सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल दादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर पलूस कडेगाव  विधानसभेचे आमदार माजी सहकार मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम तसेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील यांचा विजय झाला, खरंच असे म्हणावे लागेल , की विशाल दादांचा “प्रकाश” मय “विश्व” विजय..!.

तसं पाहता दिलेला शब्द, वचन कसं पिळावं आणि मित्राला  आपल्या सहकार्याला शेवटपर्यंत साथ कशी द्यायची हा आदर्श सांगली जिल्हाला नव्हे तर महाराष्ट्र राज्यसह देशाला  माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिला. नक्कीच आदर्श लोकं चिरकाल स्मरणात ठेवतील.

आपले आजोबा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेलं संविधान याचा आदर्श घेऊन वाटचाल सुरू ठेवणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मिरज येथील एका सभेमुळे कसा चमत्कार घडतो, हेही अनेकांना नक्कीच स्मरणात राहील.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!