जायंट्ससाठी काकासाहेब चितळें यांचे मोठे योगदान : क्रांती कारखान्याचे चेअरमन, युवा नेते शरद लाड
भिलवडी येथे जायंट्सचा पदग्रहण व शपथविधी कार्यक्रम

दर्पण न्यूज भिलवडी :-
चितळे उद्योग समुहाचे उद्योगपती स्व.काकासाहेब चितळे यांनी जायंट्स ग्रुपची उभारणी केली. समाजाची नाळ जपण्याचे काम चितळे कुटुंब करत आहे. एक वेगळी उर्जा तयार करण्याचे काम जायंट्समध्ये होते. काकासाहेब चितळेंचे यात मोठे योगदान आहे आणि त्यांचा भक्कम वारसा गिरीश चितळे चालवत असल्याचे प्रतिपादन
क्रांती कारखान्याचे चेअरमन, युवा नेते शरद लाड यांनी केले.
येथील जायंट्सच्या पदग्रहण व शपथविधी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीश चितळे, भक्ती चितळे, जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे केंद्रीय समितीचे सदस्य डॉ.सतीश बापट, ॲड विलासराव पवार, डॉ. साधना मालगावे, अनुजा पाटील, सुहास खोत, भिलवडी
जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, सहेलीच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर व सर्व सदस्य उपस्थित होते.
लाड म्हणाले,
अतिशय कौटुंबिक कार्यक्रम मला बघायला मिळाला. राजकीय व्यासपीठ नसल्याने कसलीही चिंता नव्हती. जायंट्स सदस्यांचा सर्व उपक्रमात मोलाचा सहभाग आहे. ज्याला सामाजिक कार्य करायचे आहे त्यांनी या ग्रुपमध्ये यावे. नुतन अध्यक्ष महावीर चौगुले यांचा वारसा समाजकारणाचा आहे. एकरूप होऊन ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. कसलीही मदत मागा मी नक्की देईन असा विश्वास त्यांनी दिला.
जायंट्स ग्रुपच्या नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी महावीर चौगुले, उपाध्यक्षपदी विशाल सावळवाडे, शिवाजी कुकडे यांची तर सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी सविता महावीर चौगुले तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला परीट, स्नेहा शेडबाळकर यांची निवड करण्यात आली. यंग जायंट्सच्या अध्यक्षपदी ऋतिक पाटील आणि उपाध्यक्षपदी योगेश वाळवेकर, वरद चौगुले यांची निवड केली. यावेळी गुंडूराव वसवाडे यांनी नुतन सदस्यांना शपथ दिली.
गिरीश चितळे म्हणाले,
भिलवडी जायंट्सने भरीव कामगिरी केली आहे. सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळाली आहेत. नवीन सदस्य व पदाधिकारी यांनीही उल्लेखनीय कार्य करावे.
नुतन अध्यक्ष महावीर चौगुले म्हणाले, काकासाहेब चितळे यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणार आहे. चांगले कार्यक्रम राबवून जायंट्सला उंचीवर ठेवणार असल्याचे सांगितले.
यावेळी डी.आर.कदम यांना सेवागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
फेडरेशन टू क अध्यक्ष
प्रशांत माळी, साधना मालगावे, डी.आर.कदम, विलासराय पवार, सतीश बापट यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन के.आर.पाटील तर आभार आश्लेषा चौगुले यांनी मानले.
सुरेंद्र वाळवेकर, दत्ता उतळे, क्रांती संचालक विजय पाटील, सीमा शेटे, सुरैय्या तांबोळी उपस्थित होते.