भिलवडी चितळे डेअरी फार्म येथे “ए टू झेड डेअरी फार्मिंग” पुस्तकाचे प्रकाशन

दर्पण न्यूज भिलवडी : पराग घोगळे,प्रशांत कुलकर्णी लिखित
दूध व्यवसायाकडून उद्योजकतेकडे
ए टू झेड डेअरी फार्मिंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी संपन्न झाला.
जातिवंत दुधाळ गाई आणि म्हशींची निवड, विविध हंगामानुसार व्यवस्थापन, आहार नियोजन, टोटल मिक्सड राशन, गाभण गाई म्हशीची काळजी, वासरांचे व्यवस्थापन, गोट्याची जैव सुरक्षितता आणि रोग नियंत्रण, स्वच्छ दूध उत्पादन, वर्षभर चाऱ्याचे नियोजन, दुधाचा उत्पादन खर्च, कासेची रचना व मस्टायटिस नियंत्रण आदीबाबत सविस्तर व सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत
लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी यांनी दूध व्यवसायाकडून उद्योजकतेकडे
ए टू झेड डेअरी फार्मिंग पुस्तकाची निर्मिती केली आहे.
शेतकरी ट्रेनिंग हॉल,पशुसंवर्धन व विस्तार विभाग मे बी जी चितळे, भिलवडी स्टेशन
येथे उद्योजक विश्र्वास चितळे, अतुल चितळे,चितळे डेअरी पशू संवर्धन विभागाचे सी.व्हि.कुलकर्णी,डॉ.इंगळे,डॉ.जाधव यांच्या हस्ते ए टू झेड डेअरी फार्मिंग पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
तत्पूर्वी सी व्हि कुलकर्णी यांनी लेखक परिचय करून दिला. त्यानंतर लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी यांचा स्वागतपर सत्कार उद्योजक विश्वास चितळे व अतुल चितळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी चितळे डेअरी पशू संवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी तसेच उद्योजक विश्वास चितळे,अतुल चितळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना उद्योजक विश्वास चितळे यांनी
प्रॅक्टिकल ज्ञानाचे पुस्तक म्हणजे ए टू झेड डेअरी फार्मिंग हे पुस्तक असून, या पुस्तकातील माहितीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला तर
या पुस्तकातील माहितीचा अभ्यास करून त्यानुसार दुग्ध व्यवसाय वाढवून जीवन समृद्ध करावे असे आवाहन युवा उद्योजक अतुल चितळे यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रस्तावित व सूत्रसंचालन सी व्ही कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. इंगळे यांनी मानले