धनगांव रस्त्याच्या कडेला कचरा टाकणार्यावर कायदेशीर कारवाई करा : लोकांची मागणी

भिलवडी : –
भिकवडी धनगांव रस्त्यावर हायस्कुल कोपर्यावर मोठ्याप्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे त्याचा त्रास शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होतो. यापुढे जर याठिकाणी कचरा टाकला तर संबधीतावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी दत्ता उतळे यांनी केली.
भिलवडी धनगांव रस्त्यावर काहि दिवसापासुन मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. जवळच भिलवडी ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. भिलवडी ग्रामपंचायत त्याठिकाणी कचरा टाकते. माळवाडी ग्रामपंचायतहि याचठिकाणी कचरा टाकते. पावसाळ्यात गाडी कचरा डेपोपर्यंत जाऊ शकत नसल्याच्या कारणामुळे माळवाडी च्या गाडीतुन रस्त्यालगतच कचरा टाकला गेला आहे. त्यात भर म्हणुन काहि हॉटेल व्यवसायीक हॉटेल वेस्ट तसेच चिकन मटन सेंटर मधील कचरा याठिकाणी आणुन टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे.
या भटक्या कुत्र्यांनी रस्त्याला जाणे येणे मुश्किल करुन ठेवले आहे. चालत जायच धाडस कोण करत नाहि ईतका त्रास आणि भिती या कुत्र्यामुळे निर्माण झाली आहे.
या रस्त्यावरुन भिलवडी आणि धनगांवमधील बहुतांष शालेय विद्यार्थी जा ये करत असतात त्यांना याचा सर्वात त्रास सहन करावा लागतो.
याबाबत माळवाडी ग्रामसेवक आणि कर्मचारी यांना प्रत्यक्ष बोलावुन विचारणा केली असता. पावसाळ्यात याठिकाणी कचरा टाकला होता पण सध्या टाकत नाहि असे सांगितले. भिलवडीचे नेते सचिन पाटिल यांनिही भिलवडी ग्रामपंचायत राबवत असलेल्या उपाययोजना सांगितल्या. तसेच चिकन मटन सेंटर मधील घाण टाकणारे तसेच हॉटेल वेस्ट टाकणारे यांच्यावर कारवाईसाठि नोटिस माळवाडी ग्रामपंचायतीने काढावी अशी सुचनाहि केली.
या कचर्यामुळे लोकांना त्रास होतच आहे पण भटक्या कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठित धरुन जावे लागते कोणतिहि दुर्घटना घडण्यापुर्वी कचरा टाकणार्यांना समज द्या आन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी दत्ता उतळे यांनी केली.
यापुढे जर रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये अशी खबरदारी घेण्याचे ठरले. यावेळी भिलवडीचे ग्रामसेवक केदारी माळवाडीचे ग्रामसेवक कांबळे
सनी यादव अभिजीत साळुंखे अदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.