किर्लोस्करवाडी रेल्वे उड्डाणपूलाची आमदार अरुण लाड यांनी घेतली माहिती

पलूस : महारेल आणि PWD च्या अभियंत्यांना केल्या सूचना
किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये जो रेल्वेचा उड्डाण पूल ,भुयारी पूल होत आहे .याबाबतची माहिती आमदार अरुण लाड यांनी घेतली . यावेळी किर्लोस्करवाडी चे सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी सदरचे दोन्ही पूल हे चुकीच्या ठिकाणी असून या पुलावरून ऊस वाहतूक होणार नाही. शेतकरी वर्ग वर्गाची फार मोठी अडचण होणार आहे. अशी माहिती लोकप्रतिनिधींना दिली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार अरुण लाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील साहेब यांना तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यास सांगितले. त्या आधारे आज सोमवारी आमदार अरुण लाड ,रेल्वेचे महा रेल् चे अभियंता साई प्रताप व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील साहेब यांनी दुधोंडी कुंडल रस्ता येथील भुयारी मार्ग तसेच किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरातील होणारा उड्डाणपूल या ठिकाणी भेट दिली. यावेळी संबंधित कामाची माहिती घेतली या मार्गावरून ऊस वाहतूक होणे खरोखरच अडचणीचे आहे.बैलगाडीची ऊस वाहतूक होणारच नाही. ट्रॅक्टरचे वाहतूक म्हणजे अपघाताला निमंत्रण होणार आहे. त्यामुळे याबाबत योग्य मार्ग काढण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुंडलिक एडके, महादेव लाड, बाबू नांगरे ,अत्तर पिरजादे ,संतोष गायकवाड, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.