भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोच्या कोल्हापूर कार्यालयाद्वारे एस्तेर पॅटन शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन



कोल्हापूर, -:
‘भारत छोडो आंदोलनाची आणखी एक वर्षपूर्ती होत असताना आपल्या समोरील आजच्या समस्या पाहता ही चळवळ आजही समर्पक आहे. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाने वसाहतवादी शक्तींना हाकलून लावले. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या नवीन भारतात आपण गरिबी, विषमता, निरक्षरता, उघड्यावर मलमूत्र विसर्जन , दहशतवाद आणि भेदभाव नष्ट करण्याचा संकल्प करू शकतो आणि या अनिष्ट गोष्टींसाठी भारत छोडो असे म्हणू शकतो.
हाच मंत्र घेऊन केंद्रीय संचार ब्युरोचे कोल्हापूर कार्यालय आणि एस्तेर पॅटन हायस्कूल यांनी आज भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा केला. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित विषयावर आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्फे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आज भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती जागविण्यात आल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता माने, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रिय प्रसिद्धी अधिकारी महेश चोपडे, तांत्रिक सहायक प्रमोद खंडागळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी सर्व उपस्थितांनी आणि विद्यार्थ्यांनी पंचप्रणची शपथ घेतली.