रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयावर संविधान सन्मान मोर्चा ; शेकडो अनुयायी उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी यासह अनेक मागण्या

पलूस : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने पलूस तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ पलूस तहसील कार्यालयावर भव्य संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला. शेकडो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चास सुरवात करण्यात आली.डॉ .आंबेडकर पुतळ्यापासून सुरवात करून तहसील कार्यालयात सभा घेवून तहसीलदार दिप्ती रिटे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्यात आली. त्याचप्रमाणे आंबेडकरी तरुणाला पोलीस कस्टडीमध्ये त्याची निर्घृण हत्या केली त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे बीड येथे झालेल्या खुनाची सखोल चौकशी करण्यात यावी व बीडमध्ये वाढत चाललेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवावा त्याचप्रमाणे भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे स्टेटमेंट संसदेत दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी भारत देशातील तमाम आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशा पद्धतीच्या अनेक मागण्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आल्या.
पलूस तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यामध्ये राजेश तिरमारे, बोधिसत्व माने, विशाल तिरमारे, मधुकर कांबळे, देवदास कोकळे, रमजान मुजावर, दीपक कांबळे,वैभव रांजणे, संभाजी कांबळे, सुनील कुंदे, नितीन काळे, शितल मोरे, अनिल सावंत, दिनेश वाघमारे, नंदकुमार लोटे, रणजीत कांबळे, अमोल धाईंजे, चरण दिवाण, मनोज होवाळ किरण बनसोडे मिलिंद वाघमारे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.