पै चंद्रहार पाटील यांचा अभिमान, सर्व सहकार्य करणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एम्स हॉस्पिटल जम्मू येथे सिंदूर महारक्तदान यात्रेचे उद्घाटन, समारोप ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

दर्पण न्यूज जम्मू काश्मीर :- भारतीय सैनिकांनी देशसेवेसाठी रक्त सांडले. तर पै चंद्रहार पाटील यांनी देशाच्या इतिहासात सांगली जिल्ह्यातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त पहिलवांना घेऊन जम्मू काश्मीर महारक्तदान यात्रा केली, याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या काळात चंद्रहार पाटील यांच्या ठामपणे पाठीशी राहुन सहकार्य करणार, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
AIIMS हॉस्पिटल जम्मू येथे संपन्न झालेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेच्या उद्घाटन, समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, एम्स हॉस्पिटलचे संचालक , आर्मीचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर , रक्तविर, उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर परमेश्वर नेहमी पाठीमागे असतो. त्यामुळे नेहमी कार्यरत रहा सल्ला दिला. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उद्योग मंत्री उदयजी सामंत , पै चंद्रहार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, जम्मू येथील भगिनींनी रक्षाबंधन निमित्त रक्तदात्यांना राख्या बांधल्या. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. अतिशय नेटकं नियोजन करण्यात आले होते.