निवास कांबळे सांगावकर यांचा वाढदिवस साजरा

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- कागल तालुका लोककल्याण समता प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखाना हमिदवाडा कर्मचारी , आंबेडकरी चळवतील प्रमुख कार्यकर्ते व गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्याना भीम क्रांती सोशल फाउंडेशन हरोली यांच्या वतीने लॉंग मारचे प्रणेते आदरणीय.मा. खासदार जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त असे आमचे धम्म बांधव , भारतीय बौद्ध महासभा संघटक व जवळचे मित्र आयु. निवास कांबळे सांगावकर यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी सुरुवातीस सामुदायिक बुद्ध वंदना, त्रिशरण , व पंचशील ग्रहण केले. त्यानंतर निवास कांबळे यांना वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सुद्धा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या सुविधा पत्नी भूमिका कांबळे, कन्या मयुरी कांबळे, सरपंच अनिल कांबळे सुरपली , नागेश कांबळे व्हनाळीकर, अमर जिरगे व उदय कांबळे बांणगे, दिलीप कांबळे सर कापशीकर, लॉर्ड बुद्धा चॅनल प्रतिनिधी दिनेश कांबळे मळगेकर, सामाजिक कार्यकर्ते मंजुनाथ वराळे साहेब, मलगोंडा कांबळे , जावई अरविंद कांबळे कागल , देवेंद्र कांबळे दिंडनेरली ,व शंकर नरके आणुर इत्यादीं प्रमुख व त्यांचे कुटुंबीय हजर होते. शेवटी या सर्वांचे आभार आयु. हिरामणी कांबळे सर नंद्याळकर यांनी मानले.