भिलवडी -माळवाडी येथे विकासकांचा धूमधडाका : माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते शुभारंभ
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथे विविध विकासकामांचा धूमधडाका करण्यात आला. माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती होती.
माजी कृषीराज्य मंत्री व विद्यमान आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ५८ लाख रूपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते व महेंद्र आप्पा लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.२४ जून २०२३ रोजी करण्यात आला. यामध्ये
वार्ड क्र.१ मधील पंचशील नगर येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे,
वार्ड क्र.२ मध्ये दत्ता पाटील ते वसंत कदम घर रस्ता काँक्रिटीकरण करणे,
वार्ड क्र.३ मध्ये तानाजी मोकाशी बोळ बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे , वार्ड क्र.४ मध्ये वाचनालया जवळ बंदिस्त गटर व पेविंग ब्लॉक बसविणे, वार्ड क्र.६ मध्ये पेट्रोल पंपामागील बाजूचे बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे,
मौलानानगर आर सी सी गटार बनविणे , दत्त नगर येथील सपकाळ वाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे त्याचबरोबर
बाहेरील गल्ली येथील वॉटर एटीएमचा शुभारंभ व भिलवडी ग्रामपंचायत समोरील बंदिस्त गटार व रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच सौ विद्याताई पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्राम (दादा) पाटील, महाराष्ट्र राज्य काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी.डी.पाटील, बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासो मोहिते,मुसा चाचा शेख, बाळासो मोरे, जावेद तांबोळी,उत्तम रांजणे, शशिकांत उंडे आधीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पलूस तालुक्यातील माळवाडी येथे सुमारे 16 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी कृषी राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या हस्ते व महेंद्र आप्पा लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत खंडोबाची वाडी, माळवाडी व चोपडेवाडी गावांना नळ पाणीपुरवठा करणे कामी 14 कोटी 77 लाख रुपयांचा निधी आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला. त्या कामाचा शुभारंभ त्याचबरोबर माळवाडी येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये, बंदिस्त गटार करणे 17 लाख रुपये अशा विविध विकास कामांचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आ. डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर माळवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पिकप शेडचे लोकार्पण व विविध क्षेत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माळवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह माळवाडीव परिसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.