ताज्या घडामोडी
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भिलवडी जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गणाचा रविवारी प्रचार शुभारंभ


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस :- सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भिलवडी जिल्हा परिषद गटाचा प्रचार शुभारंभ रविवार दि. 25 जानेवारी 2026 सकाळी 09.00 वा. हनुमान मंदिर, भिलवडी येथे आहे.
भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार हजराबी बालेचाँद सलामत, पंचायत समिती- भिलवडी गण, प्रतिक संग्राम पाटील, जिल्हा परिषद – भिलवडी गट.शोभा आनंदा हजारे पंचायत समिती- वसगडे गण यांचा समावेश आहे. या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आहे. यासाठी सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन भिलवडी काँग्रेस च्या वतीने करण्यात आले आहे.



