अंकलखोप जि.प. गटात सुदीप गडदे यांची काँग्रेसकडून उमेदवारी : काँग्रेसमध्ये उत्साह

दर्पण न्यूज मिलवडी : अंकलखोप जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून सुदीप दयाप्पा गडदे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध गावांमध्ये काँग्रेस कार्यकत्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला असून नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांकडून काँग्रेसच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
गडदे कुटुंबाच्या सामाजिक कार्याची परंपरा आणि सुदीप गडदे यांचे विकासाभिमुख नेतृत्व ही त्यांच्या उमेद्वारीची प्रमुख जमेची बाजू मानली जात आहे. युवकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या सुदीप गडदे यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक उपक्रम तसेच गरिबांसाठी मदतकार्य या क्षेत्रांत सक्रिय योगदान दिले आहे. कोविड काळात गरजू नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक
साहित्य वाटप, आरोग्य व रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यामुळे युवक, महिला तसेच शेतकरी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे. सुदीप गडदे यांचे वडील यापूर्वी अंकलखोप जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, वीजपुरवठा सुधारणा आणि ग्रामविकास योजनांच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला होता. हाच विकासाचा आणि लोकसंपर्काचा वारसा सुदीप गडदे यांना लाभल्याने
नागरिकांना पुन्हा एकदा विश्वासार्ह नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेब तसेच
विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी या भागात राबवलेल्या विकासकामांचा सकारात्मक प्रभाव आजही जनतेच्या मनात कायम आहे. औद्योगिक विकास, शिक्षण संस्था, रुग्णालये, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण रोजगार निर्मितीमुळे काँग्रेस पक्षाबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे चित्र आहे. याबाबत बोलताना रोहित उर्फ पिलू वारे म्हणाले, सुदीप गडदे यांची उमेदवारी म्हणजे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. त्यांच्या कार्याची विश्वासार्हता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हेच त्यांचे मोठे बळ आहे.
दरम्यान, दलित महासंघ (मोहिते गट) यांच्या वतीने गणेश वारे यांनी सुदीप गडदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी वैभव कोले यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध समाजघटकांचा पाठिंबा मिळाल्याने गडदे यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले आहे.
सध्या अंकलखोप व परिसरातील गावांमध्ये बैठका, संपर्क दौरे आणि घराघरांत जनसंवादाच्या माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे. विकास, पारदर्शक प्रशासन, युवकांना रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही प्रमुख उद्दिष्टे सुदीप गडदे यांनी मांडली आहेत. एकूणच अनुभवाचा वारसा, विकासाचा ठसा, संघटनांचा मजबूत पाठिंबा आणि जनतेचा विश्वास या बळावर अंकलखोप जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला



