मिरज येथे माजी उप महापौर आनंदा देवमाने यांचा सह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांची उपस्थिती
सांगली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर : प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम

मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मोठा धमाका,माजी उप महापौर आनंदा देवमाने यांचा सह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. सांगली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी दिली.
भाजप पक्षातून निवडून आलेले माजी उप महापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जन सुराज्य शक्ती पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे लोक सभा निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्या बद्दल भाजप पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सामित दादा कदम यांनी यांनी आगामी काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षा मध्ये मोठा धमाका होण्याचे सूचक वक्तव्य केले होते या वक्तव्यानुसार या धमक्याला आजपासून सुरुवात झाली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षातले अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात होती त्यानुसार आज माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी मोठा धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून महायुतीचा झेंडा सांगली महापालिकेवर लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आनंदा देव माने यांनी सांगितले प्रतीक देव माने शिवाजी देवमाने अमजद इनामदार संदीप जाधव सुनील काळे रोहित होनमोरे सिद्धार्थ सातपुते स्वप्निल बंडगर राहुल सातपुते संदेश सातपुते पृथ्वीराज देवमाने ठाणेश्वर देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी डॉक्टर पंकज म्हेत्रे योगेश दरवंदर ओंकार नाईक सलीम पठाण बंडू रुईकर विनायक सरवदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत ,लवकर मेळावा घेऊन त्यांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती समित दादा कदम यांनी दिली आहे.