क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवङे येथील बालकाचा तननाशक सेवन केल्याने मृत्यू

कोल्हापूर ः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील आमजाई व्हरवङे येथील बालकाचा तननाशक सेवन केल्याने आज मूत्यू झाला.
कू. वेदांत अशोक पाटील वय ( 10) असे त्याचे नाव आहे.
कू. वेदांत हा बूधवारी सकाळी मित्रांच्या बरोबर खेळून आल्याने त्याला तहान लागली होती.त्याच्या घरातील माळ्यावर ठेवलेले तननाशक थंङ पेय म्हणून सेवन केले होते. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात( सी.पी.आर) मध्ये दाखल केले होते. उपचार सूरू असतानां आज सकाळी पहाटे 6 वाजण्याच्या सूमारास त्याचा मूत्यू झाला.
या घटनेची नोंद सी.पी.आर पोलिस चौकीत झाली आहे